Thursday, April 6, 2023

जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाने गळफास घेऊन संपविली जीवनयात्रा.

धारुर (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना. बीडच्या धारूर तालुक्यातील आसरडोह येथे उघडकीस आली आहे. चंद्रकांत लक्ष्मण सुरवसे (वय 43) असे आत्महत्या केलेल्या  शिक्षकाचे नाव आहे.
आसरडोह (बीड) येथील रहिवासी असलेले चंद्रकांत सुरवसे हे धारुर तालुक्यातील आसोला येथील जिल्हा परिषद शाळेवर ज्ञानदानाचे कर्तव्य बजावत होते. दरम्‍यान बुधवारी (५ एप्रील) सायंकाळी उशिरा आसरडोह येथील मोरफळी साठवण तलावाजवळ त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

गावातील दोन शिक्षकांची आत्‍महत्‍या

शिक्षक चंद्रकांत सुरवसे यांनी आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून धारूर पोलीस याविषयीचा अधिक तपास करत आहेत. दरम्यान महिनाभरात दोन शिक्षकांनी गावातच आपलं आयुष्य संपवल्याने आसरडोह येथे हळहळ व्यक्त केली जात आहे.

No comments:

Post a Comment