परळी वैजनाथ (प्रतिनिधी) सदगुरू श्री वामनराव पै संचलित जीवन विद्या मिशन परळी शाखेच्या वतीने 16 एप्रिल रोजी वैद्यनाथ महाविद्यालयात एक दिवसीय स्वानंद योग शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबीरात तज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध होणार असून आपल्या सर्वांगिण उत्कर्षाची दिशा आणि जीवन विद्येची ओळख करून देणारे विविध कोर्स यामध्ये घेतले जाणार आहेत.
वैद्यनाथ महाविद्यालयात 16 एप्रिल रोजी फंक्शन हॉलमध्ये सकाळी 9 ते 1 या वेळेत स्वानंद शिबीराचे आयोजन जीवन विद्या मिशनच्या वतीने करण्यात आले आहे. विविध स्तरावर स्वानंद योग शिकविण्यात येणार असून मन, धन, तन अशा विविध गोष्टींवर यामध्ये मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे. विविध प्रश्नांची उत्तरे या शिबीरात दिली जाणार असून देणगी मुल्य केवळ 100 रूपये एवढे ठेवण्यात आले आहे. 15 वर्षापुढील कोणीही नागरीक यामध्ये सहभागी होवू शकतो. दरम्यान नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी वैजनाथअप्पा कोल्हे-9822980292, संजय सेवलकर-9822095958,महेश मुंडे-9623897777,रमाकांत अप्पा निर्मळे-9822867842 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जीवन विद्या मिशन शाखा परळीच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment