Thursday, April 14, 2022

युवक नेते अक्षयभैया मुंदडा यांच्या हस्ते ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे यांचा सत्कार.


अंबाजोगाई (प्रतिनिधी) ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे यांची अ.भा.वारकरी मंडळ संत संमेलनाच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आज बुधवार दि.13 एप्रिल रोजी त्यांचा युवक नेते अक्षयभैय्या मुंदडा यांच्या हस्ते उमराई येथे सत्कार करण्यात आला.
अंबाजोगाई तालुक्यातील उमराई येथे श्रीराम कथा सुरू आहे. उमराई येथे सुरू असलेल्या श्रीराम कथेस आज बुधवार दि.13 एप्रिल रोजी ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे यांनी सदिच्छा भेट दिली. 
यावेळी युवक नेते अक्षयभैया मुंदडा व अ.भा.वारकरी मंडळ महाराष्ट्र  राज्य उपाध्यक्ष  ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले.  यावेळी अक्षयभैया मुंदडा यांच्या हस्ते   ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे यांची राज्य उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास भाविक भक्तांची मोठी उपस्थित होती.

No comments:

Post a Comment