Friday, April 1, 2022

परळी वीज निर्मिती केंद्राची पर्यावरण व सुरक्षा पथकाने केली पाहाणी कामकाजावर केले समाधान व्यक्त.


परळी वैजनाथ (प्रतिनीधी) : मुंबई येथील पर्यावरण व सुरक्षा विभागाच्या पथकाने नुकतीच परळी वीज निर्मिती केंद्रास भेट देऊन विविध कामांची पहाणी केली. पथकाने परळी वीज निर्मिती केंद्राच्या कामकाजावर समाधान व्यक्त केले आहे. पर्यावरण व सुरक्षा विभागाचे कार्यकारी संचालक नितीन वाघ, अधिक्षक, रसायनशास्त्रज्ञ विवेक घोडमारे यांच्या पथकाने परळी औष्णिक वीज केंद्राला भेट दिली. यावेळी मुख्य अभियंता मोहन आव्हाड, उपमुख्य अभियंता शाम राठोड, कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ के. एस. तुपसागर , गोविंद नागरगोजे यांनी त्यांचे स्वागत केले. 

यावेळी पथकाने थर्मल मधील सांडपाणी प्रक्रिया, राखेची विल्हेवाट आणि जलप्रक्रिया विभागला भेट दिली असता केमिस्ट अधिकारी व कर्मचारी यांच्या सोबत विविध विषयावर चर्चा करून समस्या जाणून घेतल्या व मार्गदर्शन केले. तसेच, चालू असलेल्या संच क्रमांक 8 मधील ईटीपीच्या बांधकामाची पहाणी केली. व्यवस्थापकीय संचालक मुंबई यांच्या आदेशानुसार आलेल्या या पथकाने परळी वीज निर्मीती केंद्राच्या एकूणच कार्यावर समाधान व्यक्त केले.

No comments:

Post a Comment