Friday, April 1, 2022

रमजान ईद निमित्त मराठवाड्यातील मुस्लिम बांधवांसाठी रोजा वेळा पत्रकाचे प्रकाशन.


परळी वैजनाथ (प्रतिनीधी) राजस्थानी मल्टिस्टेटचे चेअरमन, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बीड जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य चंदुलाल बियाणी यांच्या माध्यमातून मुस्लिम बांधवांसाठी मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांतील व शहरातील मुस्लिम बांधवांना रोजा इफ्तार वेळापत्रक देण्यात येतात.

मुस्लिम बांधवांचा सर्वात पवित्र सण रमजान ईद दि.३ एप्रिल २०२२ पासून सुरू होत आहे आहे. मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहात रोजा पाळतात. त्यांच्यासाठी राजस्थानी मल्टिस्टेटचे चेअरमन चंदुलाल बियाणी यांच्या माध्यमातून रमजान महिन्याचे रोजा वेळापत्रक देण्यात आले. तसेच, रमजान प्रार्थना, दुआए कुनूत, तरावीह की दुआ आदिंची माहिती वेळापत्रकाच्या दुसऱ्या बाजूला आहे. दरवर्षी राजस्थानी मल्टिस्टेटच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला जातो. ज्या जिल्ह्यात, शहरात राजस्थानी मल्टिस्टेटची शाखा आहे. अशा संपूर्ण ठिकाणी देण्यात येणार आहेत. यामध्ये बीड, परळी, अंबाजोगाई, लातूर, उदगीर, जालना, अंबड, परभणी, गंगाखेड, नांदेड, औरंगाबाद आदी ठिकाणी पंधरा हजार वेळापत्रक कार्ड वाटप करण्यात येणार आहेत.

रमजान ईदच्या रोजा इफ्तार वेळापत्रकाचे अनावरण दै. मराठवाडा साथी कार्यालयात राजस्थानी मल्टिस्टेटचे चेअरमन चंदुलाल बियाणी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक दैनिक न्याय टाईम्सचे संपादक बालकीशन सोनी यांनी केले. दरम्यान, चंदुलाल बियाणी यांनी मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी रज्जाक कच्छी भाई, शेख शम्मू, जुबेर कच्छी, बकश भाई, अथर सर, उमर बागवान, इम्रान भाई, इसाम भाई, कलीम भाई, जानी भाई, व्यवस्थापक ओमप्रकाश बुरांडे आदी उपस्थित होते

No comments:

Post a Comment