Tuesday, April 12, 2022

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या उपोषणाला भाजपाने पाठिंबा देताच.न. प. प्रशासनाने तात्काळ थकीत वेतन देण्याचें आदेश देऊन उपोषण थांबवले.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : गेल्या 3 दिवसापासून नगरपालिकेतील निवृत्त कर्मचारी आपल्या हक्काच्या थकीत वेतानासाठी नगरपालिका इमारती समोर उपोषणाला बसलेले होते,गेल्या दोन दिवसापासून नगरपालिका प्रशासन त्यांची दखल ही घेत नव्हते, आज मा ना पंकजाताई मुंडे व डॉ खा प्रीतमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली  भारतीय जनता पक्षाने पाठिंबा दर्शविताच, तात्काळ न प प्रशासन जागे झाले आणि त्यांनी थकीत वेतन देण्याचे आदेश देऊन उपोषण थांबवले, या मुळे निवृत्त कर्मचाऱ्यांनि समाधान व्यक्त केले आहे.
फेब्रुवारी व मार्च 2022 ची पेन्शन 19 एप्रिलपूर्वी देण्यात यावी म्हणून सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांनी निवेदन दिले होते, मागील 2 वर्षांपासून पेन्शन ही वेळेवर मिळत नाही,मागील दोन वर्षांपासून अनेक सेवानिवृत्त कर्मचारी आजाराने ग्रस्त आहेत,अनेकांचे सेवानिवृत्ती चड उपदान मिळाले नाही तर काहींना प्रॉव्हिडंट फंड ही मिळालेला नाही त्याच बरोबर सातव्या वेतन आयोगाची फरकाची रक्कम ही कर्मचारी वर्गाला मिळालेली नाही या आणि अशा विविध मागण्यांसाठी न प निवृत्त कर्मचारी वर्गाने मागील दोन दिवसांपूर्वी उपोषण चालू केले होते मात्र नगरपालिका प्रशासन दखल घेत नव्हते मात्र आज भाजपच्या कार्यकर्त्यांनी उपोषणकर्त्याना पाठिंबा दिला व उपोषण कर्त्यांची मागणी पूर्ण करण्या संदर्भात न प प्रशासनाचे अधीक्षक संतोष रोडे यांना धारेवर धारेवर धरून जाब विचारला,प्रसंगी न प प्रशासनाने नरमाईची भूमिका घेत निवृत्त कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन तात्काळ देण्याचे आदेश देत इतर मागण्या ही मान्य करून उपोषण स्थगित केले,या प्रसंगी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचे निवृत्त कर्मचारी संघटनेने आभार मांडले  या वेळी भाजपाचे नगरसेवक प्रा पवन मुंडे, मोहन जोशी,अरुण पाठक, अनिस अग्रवाल,नितीन समशेट्टी,सचिन गित्ते,अश्विन मोगरकर,योगेश पांडकर,प्रशांत कराड, किशोर केंद्रे,राहुल केंद्रे,,गोविंद चौरे,सुशील हरंगुळे,दिलीप नेहरकर,नरेश पिंपळे,अनिस शेख,श्रीनिवास राऊत,श्रीपाद शिंदे,शाम गित्ते,निलेश जाधव,अनिश कुरेशी,गोविंद मुंडे,धनराज कुरील,अच्युत जोगदंड,उमेश निळे,राहुल घोबाळे,गोविंद मोहेकर,अंगद माळी, सुनील कांबळे,विजय बुंदेले, संदीप चौंडे,गजूजी राजनाळे,गोपाळ केंद्रे,सोमनाथ गित्ते आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment