अंबाजोगाई (प्रतिनिधी) येथील पाटबंधारे विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी तथा कोष्टी समाजातील ज्येष्ठ नागरिक बालासाहेब रुघे यांचे आज रविवार दिनांक 10 एप्रिल रोजी पहाटे 4.30 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले मृत्युसमयी ते 75 वर्षे वयाचे होते.
अंबाजोगाई येथील कोष्टी समाजातील ज्येष्ठ नागरिक बालासाहेब रुघे यांचे आज पहाटे निधन झाले. बालासाहेब रुघे हे अत्यंत मनमिळावू व सुस्वभावी असल्याने ते सर्व परिचित होते. कोष्टी समाजातील विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात सक्रिय सहभागी असत. बालासाहेब रुघे यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा नितीन, सुन, पाच मुली जावई, दोन बहिणी, नातवंडे असा भरगच्च परिवार आहे. दरम्यान बालासाहेब रुघे यांच्या पार्थिवावर आज दुपारी एक वाजता अंबाजोगाई येथील बोरुळ तलाव येथे अंत्यविधी करण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment