Sunday, April 3, 2022

आडस - होळ रस्त्यावर जळालेला मृतदेह आढळला अपघात का घातपात पोलीस तपास करत आहेत.


केज (प्रतिनीधी) आडस- होळ रस्त्यावर रविवारी दि .3 एप्रिल रोजी सकाळी एका अज्ञात व्यक्तीचा जळालेला मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे . घटनास्थळी युसूफवडगाव पोलिसांनी धाव घेतली असून घातपाताची शक्यता वर्तविण्यात येत आहे .

केज तालुक्यातील आडस – होळ रस्त्यावर अनोळखी व्यक्तीचा पुर्णपणे जळालेला मृतदेह आज सकाळी आढळून आला . घटनेची माहिती मिळताच युसुफ वडगाव पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा सुरू आहे . सदरील व्यक्तीला घटनास्थळीच कडब्याच्या बुचाडात जाळण्यात आले असावे असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे . पोलीस तपासात याबाबतीत खुलासा होईल .

 मृतदेह पुर्णपणे जळालेला असल्याने ओळख पटविण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे . हा मृतदेह नेमका महिलेचा की पुरुषाचा हे ही जळाल्याने अंदाज येत नाही.

No comments:

Post a Comment