बेलापुर (प्रतिनीधी) बेलापूर बु येथील खटकळी या ठिकाणी असणारे जागृत देवस्थान श्री. कानिफनाथ महाराज मंदिर आहे.त्या ठिकाणी काही टुकार, रिकामटेकडे व्यक्ती त्या ठिकाणी जुगार खेळतात, दारू व गांजाचे ई. मादक पदार्थांचे सेवन करतात. त्यामुळे मंदिराच्या पावित्र्याला धोका पोहोचत आहे. याची तक्रार गौस आजम सेवाभावी संस्थाने केली आहे.अधिक माहिती घेतली असता असे समजते की हे देवस्थान फार जुने पुरातन काळातील असून या ठिकाणी पूर्वी फक्त चौथरा होता व त्यावर समाधी आहे. बेलापूर गावातील कानिफनाथ महाराजांना मानणाऱ्या भाविकांनी त्याचा जीर्णोद्धार केलेला आहे. या चौथर्यावरील समाधीवर सुंदर असे मंदिर बांधलेले आहे सभोवतालच्या परिसरात फुलांचे झाड लावून सुंदर अशी बाग बनवली दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी पाणी पिण्यासाठी तो हात पाय धुण्यासाठी ग्रामपंचायत मार्फत आणून पाण्याची व्यवस्था केली आहे अशा या रम्यजागी भाविक देव दर्शन घेतल्यानंतर थोडाफार वेळ बसून आपले व्यवहार विसरून चिंतनात मग्न होतात. तसेच आजूबाजूच्या परिसरातील स्त्रिया या ठिकाणी पाणी भरावयास येतात परंतु आता अशा या उपद्रवी लोकांमुळे याठिकाणी येणाऱ्या भाविकांना त्रास होत आहे. त्या ठिकाणी काही टुकार, रिकामटेकडे व्यक्ती त्या ठिकाणी जुगार खेळतात, दारू व गांजाचे ई. मादक पदार्थांचे सेवन करतात. त्यामुळे मंदिराच्या पावित्र्याला धोका पोहोचत आहे. हे एक जागृत देवस्थान असल्यामुळे त्याठिकाणी दूरवरून भाविक दर्शनासाठी येतात. याठिकाणी होणाऱ्या वाईट कृत्यांमुळे भाविकांच्या भावना दुखावत आहे.
अशा गोष्टींवर लवकरात लवकर आळा घालणे गरजेचे आहे. त्या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी असे निवेदन गौसे आजम सेवाभावी संस्था यांनी पोलीस निरीक्षक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन यांना दिलेले आहे.
यावेळी गौसे आजम सेवाभावी संस्था चे संस्थापक मुख्तार सय्याद , अध्यक्ष सुलतान शेख , उपाध्यक्ष असीम शेख ,भोकर शाखा अध्यक्ष ,नेवासा शाखा अध्यक्ष सिदिक शेख अशोकनगर शाखा अध्यक्ष अरबाज शेख ,आसिफ शेख ,मुयर मोरे आरीफ शेख आयूब शेख शारूख सय्यद आयन शेख , उपकार्यध्यक्ष नासिर शेख ,हारून अत्तार ,मोहसीन सरदार सय्यद, आकाश गाळंफाडे मुनाभाई पहलवान अलीभाई शेख विकास चोपड़े फैजान शेख ,मोईन शेख विजय मोरे परसाद शिंदे नासिरभाई शेेख उपस्थित होते
No comments:
Post a Comment