राज्यातील काही भागात दोन समाजात तेढ निर्माण होण्याचे प्रयत्न केले जात आहेत. बीड जिल्ह्यात यामुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी यांनी प्रतिबंधात्मक आदेश दिले आहेत.
10 ते 24 फेब्रुवारी दरम्यान जिल्ह्यातील कोणत्याही भागात पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येता येणार नाही. मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) (3)नुसार प्रतिबंधात्मक आदेश देण्यात आले आहेत. या काळात कोणीही व्यक्ती शस्त्र, काठी, तलवार, बंदूक जवळ बाळगणार नाहीत.
कोणतेही शस्त्र, दाहक पदार्थ जवळ बाळगणार नाहीत. दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी भाषणे करणार नाहीत. आंदोलन,मोर्चे करता येणार नाहीत. यासह विविध आदेश दिले आहेत.
बीडचे अप्पर जिल्हाधिकारी संतोष बनकर यांच्या स्वाक्षरी ने हे आदेश देण्यात आले आहेत. हे आदेश मोडणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे
No comments:
Post a Comment