Thursday, February 3, 2022

परळीत दोन राजकीय गटात तुफान हाणामारीची घटना.संभाजी नगर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल.


परळी वैजनाथ ;- परळी येथे काल रात्री दोन राजकीय गटांत तुफान हाणामारी ची घटना समोर आली आहे. ही घटना काल (२ फेब्रुवारी) रात्रीच्या सुमारास घडली. सदरील घटनेत दोन्हीही बाजूचे कार्यकर्ते जखमी झाले असून, संभाजीनगर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्ह्यांची नोंद करण्यात देखील आला आहे. नगर पालिका निवडणुका ऐन तोंडावर आलेल्या असतांना कायदा व सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. संभाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेशपार रोडवर दोन राजकीय गटांत भांडण झाली. माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक दीपक देशमुख व माजी नगरसेवक कराळे यांच्यात ही भांडणे झाली. धनंजय बालासाहेब कराळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार माजी नगराध्यक्ष दीपक रंगनाथराव देशमुख, मुकुंद दीपक देशमुख, निलेश देशमुख, गणेश देशमुख, सुनील देशमुख यांच्यावर कलम 143, 147, 148, 149, 324, 323, 504, 505, 427 भादंवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गणेश दिपकराव देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार माहेशनाना कराळे, धनंजय कराळे व ओम कराळे यांच्यावर संभाजीनगर ठाण्यात कलम 143, 147, 148, 149, 324, 323, 504, 505, 427 भादंवी नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आला आहे तर पोलीस निरीक्षक सुरेश चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनिरीक्षक मंठाले हे घटनेचा अधिक तपास करत असल्याची माहिती पोलिसांमार्फत देण्यात आली आहे.


No comments:

Post a Comment