Friday, February 11, 2022

चौसाळा येथे बौध्द विहारास निधी उपलब्ध करून देण्यात यावा--पवन कुचेकर.


" माजी मंञी जयदत क्षीरसागर याना दलित युथ पँथर च्या वतीने निवेदन"

बीड (प्रतिनिधी)बीड तालुक्यातील चौसाळा येथील राजश्री छञपती शाहू नगर याठिकाणी नवीन बौध्द विहार व तसेच भीम नगर याठिकाणी पडझड झालेल्या बौध्द विहाराच्या दुरूस्ती साठी तात्काळ निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी दलित युथ पँथरचे राज्य सचिव तथा बीड जिल्हाध्यक्ष पवन कुचेकर यांच्यासह शिष्टमंडळाने माजी मंञी जयदत क्षीरसागर यांच्याकडे केली आहे 

चौसाळा शहरातील शाहू नगर व तसेच भीम नगर या दोन्ही ठिकाणी बौध्द समाजाची मोठया प्रमाणावर लोकसंख्या असुन पंरतु भीम नगर याठिकाणी असलेले पुर्वीच्या बौध्द विहाराची मोठया प्रमाणावर पडझड झालेली आहे याकरिता याठिकाणी नवीन बौध्द विहार उभे राहणे गरजेचे असुन तसेच शाहु नगर भागात देखील बौध्द विहार बांधकाम शासकीय जागा उपलब्ध करून बौध्द विहारास मंजुरी देण्यात यावी या मागणी करीता आज माजी मंञी जयदत क्षीरसागर साहेब यांची आज दलित युथ पँथर च्या शिष्टमंडळाने भेट घेवुन मागणी केली आहे 
लवकरच दोन्ही प्रभागात बौध्द विहारास मंजुरी मिळवुन देण्याचे आश्वासन माजी मंञी जयदत क्षीरसागर साहेब यानी चौसाळा येथील बौध्द समाज बांधवाना दिले आहे

No comments:

Post a Comment