Sunday, February 6, 2022

अमृताचा वर्षाव करणारी स्वर यात्रा आज थांबली - चंदुलाल बियाणी.

परळी वैजनाथ -आपल्या अत्यंत मधुर आणि अमृततुल्य गायनाने  मंत्रमुग्ध करणाऱ्या लता मंगेशकर यांच्या निधनाने गीत आणि संगीताची स्वरयात्रा साज संपुष्टात आली. सुमारे आठ दशके आपण लतादीदींच्या गायनाने मंत्रमुग्ध झालो आहोत. त्यांच्या प्रत्येक गाण्याने एक इतिहास निर्माण केला असून हे 'मेरे वतन के लोगो' हे अजरामर गाणे आजही रसिकांच्या मनात घर करून आहे, या शब्दात मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी लतादीदींना श्रद्धांजली अर्पण केली.

आपल्या अमृततुल्य गायनाने लता मंगेशकर यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटातील गाण्यांना नवीन वळण दिले होते नाम गुम जायेगा, चेहरा ये बदल जायेगा मेरी आवाज ही मेरी पहचान , है लग जा गले , आनेवाला आयेगा ,चाफा बोलेना, राजा की आयेगी बारात, यशोमती मैय्या से बोले नंदलाल, अशा अनेक गीतांना लता मंगेशकर यांनी आवाज दिला असून जवळपास आठ दशके त्यांनी भारतीय रसिकांना मंत्रमुग्ध केले. साधारणपणे त्यांचा आवाज कोणत्याही अभिनेत्रींना सहजपणे जुळत होता. आपल्या गीतांच्या माध्यमातून भारतीय शास्त्रीय संगीत आणि पाश्चात्त्य संगीत या दोन्ही क्षेत्रात त्यांनी गायन केले आहे. लता मंगेशकर या केवळ भारतात नाही तर जगभरात प्रसिद्ध होत्या. रसिकांच्या मनावर अनेक वर्ष त्यांनी राज्य केले असून त्यांच्या निधनामुळे अमृत वर्षाव करणारी स्वर यात्रा आज थांबली या शब्दात मसापचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी श्रद्धांजली अर्पण केली. संत ज्ञानेश्वरांचे अभंग लतादीदींनी गायले असून आजही प्रत्येक घरात ही अभंगवाणी ऐकायला मिळते लतादीदींनी सुमारे सोळा भाषेत गाणे म्हटले असून त्यांचा आवाज अनेकांसाठी संजीवनी ठरला. ये दिल उनकी की निगाहे, हे मुलाखत तो एक बहाना है , इस मोड से जाते है , गाता रहे मेरा दिल, मन डोले मेरा तण डोले, अशी गाणे अजून लोकप्रिय आहे. लता मंगेशकर यांचे निधन ही आमच्या सारख्या रसिकांची हानी असून पुढील कित्येक वर्ष अमृताचा हा वर्षाव कायम राहील असेही चंदुलाल बियाणी म्हणाले.

No comments:

Post a Comment