परळी वैजनाथ ;- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने काल झालेल्या देवराई बीड येथील वृक्ष जळीत प्रकरणाची चौकशी करण्यात यावी व जिल्हाधिकारी कार्यालय बीड समोरील वृक्षतोड प्रकरणी संबंधित प्रशासनावर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशा प्रकारचे निवेदन पर्यावरण मंत्री श्री आदित्य ठाकरे यांना निवेदन पाठवण्यात आलेले आहे मराठवाड्यामध्ये वृक्षांचे प्रमाण कमी असताना व पूर्ण कुराडबंदी लागू असतानाही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका मोठ्या वृक्षाची कत्तल होत आहे ही अत्यंत गंभीर बाब आहे त्यामुळे याची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे या निवेदनात नमूदकरण्यात आले आहे. याप्रसंगी मनसे पर्यावरण सेना राज्य चिटणीस तथा तालुकाध्यक्ष श्रीकांत पाथरकर जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय दहिवाळ शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर तालुका उपाध्यक्ष विठ्ठलराव चीन मेवाड शहर उपाध्यक्ष ऋषिकेश बारगजे बालाजी पाटील महेश शिवग न माणिक कटिंग नरहरी लोखंडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते
No comments:
Post a Comment