Monday, February 14, 2022

वचनपुर्ती वजीरबी तलाब कट्टा कब्रस्तानच्या संरक्षण भिंतीचे उद्घाटन संपन्न.


https://vichakshan.com/vichakshan_ek_nai_soch/assets/uploads/IMG-20220212-WA0065.jpg

परळी वैजनाथ : येथील गौतम नगर भागातील नूर मजिदच्या पाठीमागील वजीरबी तलाब कट्टा कब्रस्तानच्या संरक्षण भिंतीच्या कामाचे उद्घाटन प्रभागातील नगरसेवक राजा खान उस्मान खान आणि केशव गायकवाड यांच्या उपस्थितीत १० फेब्रुवारी रोजी संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या सूचनेनुसार व परळी नगरपालिकेचे गटनेते वाल्मिक कराड यांच्या मार्गदर्शनानुसार शहरातील प्रभाग क्रमांक 8 मधील विकास कामांना वेग आला असून येथील तालाब कट्टा कब्रस्तानच्या संरक्षण भिंतीचे उद्घाटन नगरसेवक राजा खान उस्मान खान व केशव गायकवाड यांनी नारळ फोडून केले. यावेळी परळीतील उपनगराध्यक्ष शकील कुरेशी, माजी उपनगराध्यक्ष अयुब खान पठाण, नगर सेवक जाबीर खान, अजिज कच्छी, अन्वर मिस्कीन नाजेर हुसेन सेठ, रफिक, हजी बाबू, शेख मुक्तार जिलानी भाई, मजास इनामदार, जमील शेख, रौफ उर्फ चाचा, शेख अशँफाक, सादिक खान, शेख रफिक, शे शेरयार आदींची यावेळी उपस्थिती होती.

सदरील कब्रस्तानच्या संरक्षण भिंतीचे आश्‍वासन स्मृतीशेष पांडुरंग गायकवाड यांनी दिले होते. त्याची वचनपूर्ती झाल्याचे यावेळी स्मरण करण्यात आले. या कामासाठी धनंजय मुंडे, वाल्मिक कराड व विभागातील नगरसेवक राजा खान उस्मान खान आणि केशव पांडुरंग गायकवाड यांनी यशस्वी पाठपुरावा केल्याबद्दल प्रभागातील मुस्लिम बांधवांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment