गेवराई ;- (प्रतिनिधी) गेवराई शहरामध्ये गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनावर एसपीच्या पथकाने कारवाई केल्याची घटना घडली आहे

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गुटखा वाहतूक करणारी दोन वाहने पोलीस अधीक्षक आर. राजा यांच्या पथकाने पकडली. असून काल त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून सुमारे 3 लाख ६२ हजार रुपयांच्या गुटख्यासह सुमारे ९ लाख ६२ हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.  मिनी टेम्पो (एमएच २३ यू-१८८) व मालवाहतूक करणारी जीप (एमएच २३-५५२२) ही दोन वाहने गुटखा वाहतूक करताना आढळली. त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे  गुटखा व पानमसाला आढळला. गुटख्यासह दोन्ही वाहने असा एकूण ९ लाख ६२ हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी गेवराई ठाण्यात आरोपी  बाळासाहेब लहू जाधव (रा. पांढरवाडी ता. गेवराई) व सय्यद शेख नूर बागवान पोंदा नाका गढ़ी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याचा पुढील तपास पोलीस करत आहे