*जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत बुजवले नदीपात्रातील खड्डे.
बीड (जि. मा. का.) : शहाजनपुर चकला येथील सिंदफणा नदीतील मृत बालकांच्या घरी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पालकांचे सांत्वन केले. यावेळी त्यांच्या समवेत तहसीलदार सचिन खाडे, पोलीस निरीक्षक रवींद्र पेलगू लवार, गेवराईचे मंडळ अधिकारी, पोलीस पाटील, तलाठी, गेवराई गावचे बीट अंमलदार व शुभम गायकवाड कोतवाल आदी उपस्थित होते.
दरम्यान, जिल्हाधिकारी यांनी भरदुपारी बारा वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत शहाजनपुर चकला या गावांमध्ये नदीपात्रामध्ये भेट दिली. या ठिकाणी चार बालकांचा मृत्यू झाला त्या ठिकाणचे तसेच जवळचे खड्डे स्वतः उभे राहून बुजवुन घेतले.
तसेच गेवराई व बीड तालुक्यातील उपस्थित तलाठी, मंडळ अधिकारी तसेच बीट अंमलदार यांना तात्काळ धोकादायक खड्डे बुजवून घ्यावेत, अशा सूचना यावेळी दिल्या.
0000
No comments:
Post a Comment