Wednesday, February 16, 2022

बीड तहसीलदार डोकेच्या भोंगळ कारभाराने प्रशासनाचा लाखो रूपयांचा महसूल बुडाला.ग्रामीण पोलिसांनी दंडात्मक कारवाईचे पत्र देऊनही डोकेने दंड लावला नाही.



* २० दिवस डोके झोपला होता का?; न्यायालयाने पकडलेल्या गाड्या सोडण्याचे दिले आदेश.

बीड (प्रतिनिधी): पोलिस अधिक्षक यांच्या विशेष पथकाने १७ जानेवारीला २ हायवा (वाहन क्रमांक  एमएच-१२, क्युडब्लु ५७९७)(एमएच- २३ ९१६९) अवैध वाळू नेत असताना पेंडगाव परिसरात पकडले. ग्रामीण पोलिसांनी बीड तहसीलदारला दंडात्मक कारवाई करण्याचे पत्रही दिले.मात्र जाणून बुजून शासन,प्रशासनाची दिशाभूल करून वीस दिवस दिरंगाई करत तहसीलदार डोकेने या दोन गाड्यावर दंडात्मक कारवाईचे आदेश काढले नाही.हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने सदरील गाड्या मुक्त करण्याचे आदेश दिले. हे प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून मंडळाधिकार्‍याच्या माध्यमातून ज्या दिवशी गाड्या सोडल्या त्याच दिवशी गुन्हा दाखल करण्याचे पत्र काढले.त्यामुळे तहसीलदारची बनवाबनवी उघड झाली आहे. केवळ हे प्रकरण अंगलट येऊ नये यासाठी पोलिसांनाच आदेश काढून प्रलंबित दंडाची कारवाई करावयाची आहे. सदरील गाड्या पकडून पंचनामा करा असे लेखी स्वरूपात सांगितले आहे. त्यामुळे जाणून बुजून ग्रामीण पोलिसांना अडचणीत आणून शासन प्रशासनाचा लाखो रूपयांचा महसूल तहसीलदार डोकेच्या भोंगळ कारभारामुळे बुडाला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारीसाहेब तात्काळ याची नोंद घेऊन बीड तहसीलदार डोके यांना निलंबित करण्याची मागणी जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,महसुलमंत्री, विभागीय आयुक्त यांना सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डॉ.गणेश ढवळे यांनी केली आहे.


No comments:

Post a Comment