परळी वैजनाथ ;- परळी शहरातील सिध्दार्थ नगर,येथील रहिवासी बसुमिया इनामदार हे गेल्या अनेक वर्षांपासून सायकलवर शस्रांना धार लावून देण्याचा व्यवसाय करतात.त्यांची सायकल त्यांच्या वयाप्रमाणेच साथ देत नसल्याने, व्यवसाय बसला होता.मात्र, सामाजिक कार्यकर्ते ॲड.मनजीत सुगरे यांच्या लक्षात येताच त्यांनी,परळी न. प. चे गटनेते व जिल्हा नियोजन समिती सदस्य वाल्मीक आण्णा कराड यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी बसुमिया इनामदार यांना सायकल भेट दिली.
बसुमिया इनामदार हे सन १९७२ पासून परळी शहर व तालुक्यात सायकलवर विळा, खुरपे,कात्री,बतई,चाकू,सूरी यांना धार लावण्याचा पारंपरिक फिरस्ती व्यवसाय करणारे एकमेव बासू मामू आज ५० वर्षापासून एकाच सायकलवर व्यवसाय करतात. परंतु , काळाच्या ओघात सायकल पूर्ण मोडकळीस आली असे असतानाही त्याच सायकलवर आजही ते त्यांच्या कुटुंबाची उपजिविका भागवितात . पूर्णतःमोडकळस आलेली सायकल आणि बासू मामुंचे थकलेले शरीर त्यामुळे व्यवसाय वर निश्चितच परिणाम होत आहे.या गोष्टीची दखल घेऊन जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजयजी मुंडे साहेब यांचे बंधूतुल्य सहकारी,न.प. गट नेते तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य मा.वाल्मीकअण्णा कराड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ॲड. मनजीत सुगरे मित्र मंडळाच्या वतीने बासुमिया इनामदार यांना मा.वाल्मीक अण्णा कराड यांच्या हस्ते सायकल भेट दिली.यावेळी, माजी नगराध्यक्ष राधाबाई बियाणी,नगरसेवक चांदुलाल बियाणी, माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी न.से.बाळू सेठ लड्डा,कैलास फड , पत्रकार संजय खाकरे, मुख्तार शेख, सुनिल मुसळे आदी उपस्थित होते.दरम्यान,बसुमिया इनामदार यांना मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment