म्हाडाच्या परीक्षेत डमी उमेदवार बसवणारा अभिषेक सावंतच्या बीड आणि नागपूर पोलिसांनी  मुसक्या आवळून जेरबंद केले असून तो  आहेर चिंचोली येथील रहिवाशी आहे 

एमआयडीसी पोलिस ठाण्यात 9 फेब्रुवारी रोजी गुन्हा नोंद झाला होता. अभिषेक भारतराव सावंत  हल्ली मुक्काम शाहूनगर  त्याच्या जाग्यावर डमी उमेदवार बसवला होता. परीक्षाकेंद्रावर परीक्षेस गेल्यानंतर चुकीची स्वाक्षरी केली. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी त्यास पकडण्याचा प्रयत्न केला मात्र तो फरार झाला. त्याच्याकडे अभिषेक सावंतचे पॅन, आधार कार्ड आढळले. नागपूरचे परिक्षा नियंत्रक दिलीप लामतुसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नागपूर एमआयडीसी पोलीस ठाण्यात 9 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुरुवारी शिवाजीनगर पोलीस व नागपूर पोलिसांनी त्यास आहेरचिंचोली येथून ताब्यात  घेऊन त्याच्या मुसक्या आवळल्या सदर कारवाई शिवाजीनगर पोलीस बीड आणि नागपूर पोलिस यांनी केली आहे