बीड (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई जिल्हा शाखा बीडच्या जिल्हा उपाध्यक्षपदी दैनिक सूर्योदयाच्या आयेशा रफिक शेख आणि दैनिक बीड संचारच्या संपादिका श्रीमती प्रतिभा गणोरकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे, प्रदेश संघटक संजयजी भोकरे, प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे, मार्गदर्शक संतोष मानूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार संघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी यांनी बीड जिल्हा उपाध्यक्षपदी दैनिक सूर्योदयच्या शेख आयेशा शेख रफिक आणि दैनिक बीड संचारच्या संपादिका श्रीमती प्रतिभा कालिदासराव गणोरकर यांची निवड जाहीर केली आहे. या निवडीनंतर श्रीमती प्रतिभा गणोरकर आणि शेख रफिक आयेशा यांनी भविष्यात वृत्तपत्र सृष्टीतील प्रिंट,सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया अंतर्गत काम करणार्या महिलांचे संघटन करून त्यांच्या न्याय हक्कासाठी संघटित कार्य करणार असल्याचे म्हंटले आहे. या निवडीबद्दल श्रीमती प्रतिभा गणोरकर आणि शेख आयेशा यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
No comments:
Post a Comment