Monday, January 31, 2022

गांधीजींच्या विचारांचे प्रतीक नवीन माकड सामाजिक कार्यकर्ते बसविणार - डॉ. संजय तांदळे


*महात्मा गांधींच्या पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन व स्वच्छता मोहीम संपन्न !

बीड (प्रतिनिधी) - रविवार दिनांक 30 जानेवारी रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने गांधीजींच्या पुतळ्यासह त्यांच्या विचाराचे प्रतीक असलेल्या तीन माकडांच्या प्रतिकृतीला सुद्धा पाण्याने अंघोळ व फुलहार घालून अभिवादन करण्यात आले. तसेच जवळपासच्या परिसरातील साफसफाई मोहीम बीड नगर परिषद प्रशासनाकडून करून घेण्यात आली.
अभिवादनानंतर सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय तांदळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की, अज्ञात माथेफिरूने महात्मा गांधीजींच्या विचारावर हल्ला करत "बुरा मत देखो" चा संदेश देणार्‍या माकडाची तोडफोड करून आता जवळपास वर्ष होत आले आहे. या एक वर्षामध्ये सदरील तोडफोड करणाऱ्या माथेफिरू चा माग काढून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा याकरिता आतापर्यंत सामाजिक कार्यकर्त्यांनी तीन वेळा आंदोलने केली. जिल्हा प्रशासन, नगरपालिका प्रशासन आणि पोलिस प्रशासनाला निवेदन देण्यात आली. परंतु यापैकी कोणत्याही प्रशासनाने आतापर्यंत याची गांभीर्याने नोंद घेतली नाही की, तोडफोडप्रकरणी आतापर्यंत ना कुणावर गुन्हा नोंद केला, ना तोडफोड करणाऱ्या माथेफिरू ला पकडण्यासाठी कुठले पाऊले उचलण्यात आली, ना माकडाची नवीन प्रतिकृती आणून बसविण्यात आली. यामुळे आज महात्मा गांधींच्या पुण्यतिथी निमित्ताने आपण सर्व सामाजिक कार्यकर्ते मिळून पैसे जमा करूत आणि तोडफोड केलेल्या माकडाची प्रतिकृती येथे आणून बसवू असे म्हटले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय तांदळे यांच्यासह आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी सैनिक अशोक येडे, प्रा. बाळासाहेब शिंदे, जाधवर, ज्येष्ठ नागरिक कोलेकर, सादिक भाई यांच्यासह आम आदमी पक्षाचे अनेक कार्यकर्ते आणि मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांची प्रमुख उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment