Monday, January 24, 2022

प्रजासत्ताक दिनी बीड जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषण. भीमवाडी बौद्ध विहार कधी पूर्ण होणार सात वर्षे झाले - सचिन रोडे


*कार्यरभ कालावधी एक वर्षाचा,झाले सात वर्ष?*
*परळी नगर परिषद झोपली,गुत्तेदार बिल उचलून फरार?*

*विहार एक उपोषण मात्र तीन वेळा,मध्यस्थी समाजकंटक तोंडघशी पडले?*

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी शहरातील मध्यस्थी असलेली भीमवाडी या ठिकाणी 2014 ला नवीन बौद्ध विहार उभारण्याचा कार्यरभ आदेश परळी नगर पालिका याच्या वतीने देण्यात आला त्या आदेशानुसार एक वर्षात विहार पूर्ण करण्याचे आदेश असताना सात वर्षे उलटून गेली मात्र बौद्ध विहार अजून सुद्धा अपूर्णच आहे असे का?गुत्तेदाराला परळी नगर परिषद पाठीशी का घालत आहे या सात वर्षात तीन वेळा उपोषण करण्याची का वेळ आली आहे असा प्रश्न भीमवाडीतील नागरिकांना पडला असून या प्रजासत्ताक दिनी परत या विहाराला पूर्ण करण्याच्या मागणी करीता आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे भीमवाडीतील उपोषणकर्ते सचिन रोडे यांनी माहिती दिली आहे व परळी नगर परिषदचा अतिशय तीव्र शब्दात निषेध केला आहे शहारतील अनेक नवीन सभागृह एक वर्षात पूर्ण होऊन सामजिक कार्यक्रम होतात मग बौद्ध विहाराला जाणून बुजून उशीर करण्यात येत आहे का गुतेदाराला का पाठीशी घालत आहेत या एका विहारासाठी आतापर्यत तीन वेळा उपोषण करण्याची वेळ भीमवाडीतील महिला नागरिकांना अली आहे प्रत्येक वेळा नगर परिषद काम लवकर पूर्ण करू  म्हणून पत्र देऊन दिशाभूल करत असल्याचे सचिन रोडे यांनी म्हंटले आहे अनेक वेळा मध्यस्थी म्हणून काही समाजकंटक यांनी जीमेदरी घेऊन उपोषण मागे घ्या आम्ही गुतेदाराला बोलून काम पूर्ण करून घेऊ अशी पोकळ आश्वासन देण्यात आली मात्र वर्षे उलटून गेली तरी सुद्धा कामाला मात्र सुरवात करण्यात आली नाही आता मात्र 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी बीड जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषण करण्याचे निवेदन नगर परिषद मध्ये दिले असता दिशा भूल करण्यासाठी कामाला सुरवात हळुवार सुरूवात करण्यात आली आहे आणि उपोषणाला बसू नाही असा दबाव टाकण्याचा प्रकार होत असल्याचा आरोप उपोषण कर्ते सचिन रोडे यांनी म्हंटले आहे मात्र आता यावेळी काम पूर्ण होई पर्यत नगर परिषद बौद्ध विहार सम्बधित अधीकारी याना निलंबित करण्यात येत नाही ज्या एजेसन्सिला काम दिले आहे त्या एजेन्सीवर कारवाई होत नाही तो पर्यत सहकार्य सोबत आमरण उपोषण उठणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे

No comments:

Post a Comment