Tuesday, January 18, 2022

केज नगरपंचायत निवडणूक चार प्रभागासाठी तगडा पोलिस बंदोबस्तात मतदान .


*९ मतदान केंद्रावर एका तृतीय पंथीयांसह ६ हजार २७ मतदार बजवणार मतदानाचा हक्क.

* काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, शेकाप आणि जनविकास आघाडीत लढत .

केज (प्रतिनिधी )आज केज नगर पंचायतीच्या चार प्रभागाची निवडणुकीसाठी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.या चार प्रभागात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, शेकाप आणि स्थानिक जनविकास आघाडी यांच्यात लढत होत आहे. या चार प्रभागात एका तृतीयपंथी मतदारासह एकूण ६ हजार २७ मतदार आपला मतदानाचा हक्क बजवणार आहेत.

केज नगर पंचयतीच्या चार प्रभागात दि. १८ जानेवारी मतदान होणार आहे प्रभाग क्रमांक दोन व आठ स्त्री राखीव तर एक आणि एक व बारा हे प्रभाग खुल्या पर्व प्रवर्गासाठी आहेत. 

या चार प्रभागातील मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नऊ मतदान केंद्र आहेत. या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, शेकाप आणि स्थानिक जनविकास आघाडी व अपक्ष निवडणूक लढवीत आहेत. प्रभाग क्र. एक मध्ये एकूण सहा उमेदवार. प्रभाग क्र. दोन मध्ये चार उमेदवार. प्रभाग क्र. आठ मध्ये पाच आणि प्रभाग क्र. बारा मध्ये सहा उमेदवार .असे चार जागेच्या निवडणुकीसाठी २१ उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. 

मतदान प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पाडण्यासाठी मतदान केंद्रावर तगडा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी ८ पोलीस अधिकारी, ५० पोलीस कर्मचारी व आरसीएफ जवानांची तुकडी तैनात करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment