Thursday, January 27, 2022

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणारा क्रांतिकारी पक्ष म्हणून शेकाप मध्ये प्रवेश.–विजय मगर.



माजलगाव (प्रतिनिधी)  जिल्हा व सत्र न्यायालयाचे सेवानिवृत्त अधीक्षक श्री विजय मगर यांनी शेतकरी कामगार पक्षांमध्ये आज रोजी जाहीर प्रवेश केला त्यावेळी त्यांनी शेतकरी कामगार पक्ष हा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर प्रमाणिकपणे लढणारा क्रांतिकारी पक्ष असल्याने शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा घेऊन फुले, शाहू, क्रांतिसिंह,अण्णाभाऊ या महापुरुषांच्या विचाराने शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडवून आणण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या चळवळीच्या लढाई लढण्यासाठी शेतकरी कामगार पक्षात केल्याचे सांगितले.

जिल्हा व सत्र न्यायालयाचे सेवानिवृत्त अधिक्षक विजय एकनाथराव मगर साहेब यांनी अर्जून रावसाहेब मस्के यांच्यासह भाई अॅड.नारायण गोलेपाटील यांच्या नेतृत्वात व भाई दत्ताप्रभाळे,भाई भिमराव कुटे यांच्या उपस्थितीत शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश केला.त्यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शेतकरी कामगार पक्ष हा क्रांतिकारी पक्ष असूनस्वातंत्र्याच्या चळवळीत अग्रभागी असणारा पक्ष आहे स्वातंत्रोत्तर काळात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमकपणे लढा लढणारा पक्ष म्हणून शेतकरी कामगार पक्ष आहे, महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारधारेला प्रमाण मानुन शिव फुले शाहू क्रांतिसिंह अण्णाभाऊ या महापुरुषांच्या विचाराने शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा घेऊन लढणार असल्याचे त्यांनी सांगितले त्यावेळी भाई विष्णुपंत शेळके व भगवान खेत्री सर आदींची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment