पुष्पा’ चित्रपट पाहुण तीन अल्पवयीन मुलांनी केला एकाचा सुरा भोसकुन खुन.
लहान मुले कधी काय पाहून काय करतील याचा काहीच अंदाज घेता येत नाही. अशाच प्रकारची हि खळबळजनक घटना घडली आहे. आयकॉन स्टार अल्लू अर्जुनचा पुष्पा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आणि ओटीटीवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे . पण , त्या चित्रपटातील गुन्हेगारीने प्रेरीत होऊन तिघा अल्पवयीन मुलांनी एका व्यक्तीच्या पोटात चाकू खुपसून हत्या केली आहे . गुन्हेगारीविश्वात नाव कमविण्यासाठी हे कृत्य केलं असल्याचं त्या मुलांनी सांगितलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , दिल्लीच्या जहांगीरपुरी परिसरात या तीन अल्पवयीन मुलांनी ही हत्या केली आहे . अल्लू अर्जुनच्या पुष्पा चित्रपटात दाखविलेल्या गुन्हेगारीने ते प्रेरीत होते . या मुलांना गुन्हेविश्वास प्रसिद्ध व्हायचं होते आणि वर्चस्व निर्माण करायचं होतं . ही हत्या केल्यानंतर त्याचा व्हिडिओदेखील तयार केलेला होता . हा व्हिडिओ ते इन्स्टाग्रामवर अपलोड करणार होते. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले की , ” जहांगीरपुरी पोलीस ठाण्यात बुधवारी बाबू जगजीवन राम स्मारक रुग्णालयातून माहिती मिळाली की , एका व्यक्तीच्या पोटात सुरा घुसविण्यात आला आहे . पण , त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे . तपासात कळलं की , मृत व्यक्तीचं नाव शिबू ( वय -२४ ) आणि तो जहांगीरपुरीचा रहिवाशी होता .पोलीस उपायुक्त म्हणाल्या की , ” या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज हाती लागले आहे . त्यात मृत व्यक्तीची आणि त्या तीन अल्पवयीन मुलांची भांडणं झाली होती . त्यातून त्यांनी संबंधित व्यक्तीची हत्या केली आहे . सध्या तीन आरोपी मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे . ‘ पुष्पा ‘ चित्रपट आणि ‘ भौकाल ’ वेबसीरिज पाहून त्यांनी हे कृत्य केल्याचं आरोपी मुलांनी पोलिसांना सांगितलं आहे . आशा प्रकारे या मुलांच्या मनावर पुष्पा या चित्रपटाचा प्रभाव पडला व त्यातून ते गुन्हेगार बनले आहेत.
No comments:
Post a Comment