Sunday, January 23, 2022

सन्मान मराठी अस्मितेचा. सत्कार मराठी आत्मसात करणाऱ्या गुणी जनांचा. मराठी पाट्या लावणाऱ्याचा. - वैजनाथ कळसकर


परळी वैजनाथ ;- माय मराठी भाषेचा सन्मान मनोमन स्वीकारून ज्यानी पूर्वी पासून मराठी भाषेचा अभिमान जपला त्या सर्वांचा गौरव करताना आम्हास गर्व वाटतो,
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हिंदू हृदय सम्राट मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी त्यांना अभिवादन करून, सन्माननीय राज साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे, राज्य सरचिटणीस संतोष भाऊ नागरगोजे, राज्य उपाध्यक्ष अशोक भाऊ तावरे, प्रवक्ते प्रकाश काका महाजन यांच्या सुचणे वरून मनसे जिल्हा अध्यक्ष सुमंत धस, मनसे महिला आघाडी जिल्हाध्यक्षा रेखाताई अंबुरे, जिल्हा सचिव रवी दादा नेमाने, जिल्हा उपाध्यक्ष दत्ता भाऊ दहीवाळ, तालुका अध्यक्ष श्रीकांत पाथरकर यांच्या मार्गदर्शनानुसार, 
मनसे शहर अध्यक्ष वैजनाथ कळसकर यांच्या नेतृत्वाखाली, तालुका उपाध्यक्ष विठ्ठल झिलमेवाड, जेष्ठ मार्गदर्शक डॉ.रामलींग घणचेकर, प्रेमनाथ कदम, शहर सचिव डॉ.अशोक मंत्री, शहर उपाध्यक्ष प्रशांत कामाळे, गणेश चव्हाण, सुमित कलशेट्टे, रुषीकेश बारगजे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष हाणुमान सातपुते, परळी शाखा अध्यक्ष धनराज आव्हाड, बालाजी चुणचुणे, महेश शिवगण,माणीक लटींगे, महेश घेवारे सुहास विर, धनंजय गाडवे, सोमनाथ राजनाळे, सुनील भोसले, किशोर कुरे, श्रीमंत फड, सिद्धार्थ लांडगे यांच्या हस्ते परळी शहरातील आपल्या दुकानाच्या पाट्या मराठीत लावणार्या व्यापारी बांधवांचा सन्मान पत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला व या पुढं ही करण्यात येईल. 
मराठी भाषेत पाटय़ा असाव्यात, असा नियम असला तरी अनेक दुकानदार त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत होती त्यामुळेच राज साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार मराठी पाटय़ांसाठी दहा वर्षांपूर्वी मनसेने आंदोलन केले होते,त्यात अनेक महाराष्ट्र सैनिकांच्या अंगावर केसेस दाखल झाल्या.तसेच मनसेच्या इशाऱ्यानंतर सर्वत्र मराठी पाटय़ा झाल्या होत्या. पंरतु, अलीकडे पुन्हा मराठीला डावलून फक्त इंग्रजीमध्ये पाटय़ा लावण्याचे प्रकार वाढले होते.त्यामुळे राज साहेब ठाकरे यांनी सतत राज्य सरकारला धारेवर धरत मराठी पाट्या मराठीत असणं आवश्यक असुन त्या साठी राज्य सरकारणे कडक कायदे करावे अशी मागणी करण्यात येताच, राज्य सरकारने दि.13/01/2022 रोजी मराठी पाटय़ांची सक्ती कायदा केल्याने या पुढं सर्व पाटय़ा मराठीत होतील, अशी अपेक्षा आहे. 
जर मराठी पाट्या 12/02/2022 पर्यंत पुर्ण नाही झाल्यास पुन्हा एकदा महाराष्ट्र सैनिक खळ्-फट्याक निश्चीत करतील.

No comments:

Post a Comment