
नवी दिल्ली – ‘पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना’ ही देशातील शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी चालवली जाते. या योजनेच्या लाभार्थ्यांपैकी एक असणाऱ्या लोकांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. या योजनेत समाविष्ट असलेली एक महत्त्वाची सुविधा सरकारनं आता बंद केली आहे. ही सुविधा बंद झाल्यामुळे कोट्यवधी लाभार्थ्यांना आपलं स्टेटस तपासता येणार नाही. ज्यामुळे त्यांची आता गैरसोय होण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत, पीएम किसान योजनेत रजिस्ट्रेशन केल्यानंतर शेतकरी आपलं स्टेटस तपासू शकत होते. पीएम किसान पोर्टलला भेट देऊन, कोणताही शेतकरी आपला आधार क्रमांक , मोबाईल किंवा बँक खाते क्रमांक वापरून अॅप्लिकेशनची सध्याची स्थिती तपासू शकत होते. आपल्या बँक खात्यात किती हप्ता जमा झाला आहे, अशा गोष्टींची माहिती त्याद्वारे मिळत होती. आता मात्र, या सुविधेमध्ये थोडे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे आता शेतकरी पीएम किसान पोर्टलवर मोबाईल क्रमांक वापरू शकणार नाहीत. येथून पुढे अॅप्लिकेशन स्टेटसजाणून घेण्यासाठी आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांकच वापरणे अनिवार्य केले आहे.
No comments:
Post a Comment