Sunday, January 23, 2022

पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे यांच्या पथकाने पकडला तंबाखूचा ट्रक , 22 लाख 60 हाजाराचा मुद्देमाल केला जप्त.



केज (प्रतिनिधी) :- केज पोलीसांनी महाराष्ट्रात बंदी असलेले तंबाखूयुक्त पदार्थांची वाहतूक करणारा ट्रक केज पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या कार्यवाहीत पोलीसांनी ट्रकसह एकूण २२ लाख साठ हजार रु चा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

या बाबतची माहिती अशी की, दि. २३ जानेवारी रोजी दुपारी ४:०० वा. केज पोलीस ठाण्याचे कर्मचारी गोरख फड यांना एका गुप्त खबऱ्याने फोनवरून माहिती दिली की, महाराष्ट्रात बंदी असलेले तंबाखू भरलेला ट्रक पुणे येथुन केज मार्गे पुढे जात जात आहे. गोरख फड यांनी ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे यांनी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांना दिली. साहाय्यक पोलीस अधीक्षक यांनी त्यांना तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश देताच पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे यांनी त्यांचे सहकारी गोरख फड, महादेव बहिरवाळ, समीर शेख यांना सोबत घेऊन केज-बीड रोडवर शासकीय विश्रामगृहा समोर सापळा लावून भरधाव वेगात जाणारा ट्रक क्र. (एमएच-४६/एफ-१४१६) हा पाठलाग करून पकडला. सदर ट्रकमध्ये २८ किलो ग्रॅम वजनाचे १५० पोते भरलेला सुगंधी तंबाखूचा माल आहे त्याची किंमत १२ लाख ६० हजार रु असून ट्रकसह एकूण २२ लाख ६० हजार रु. चा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

पोलीस कर्मचारी शेख यांच्या फिर्यादी वरून ट्रक ड्रायव्हर विलास केसकर ता. चिखली जि. बुलढाणा याच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

*सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत हे केज येथे रुजू झाल्या पासून जिल्ह्यात गुटखा, मटका, बनावट बायोडिझेल यावर धडाकेबाज कार्यवाह्या करण्याचा सपाटा लावला असून यामुळे पोलीसांची प्रतिमा उंचावली आहे.


No comments:

Post a Comment