Friday, January 14, 2022

बीड जिल्ह्य़ातील देवस्थान इनाम जमिन गैरव्यवहारास बीड धर्मादाय आयुक्त जबाबदार;दोषींवर कारवाईसाठी प्रजासत्ताक दिनी आंदोलन .

___
बीड ;- बीड जिल्ह्य़ातील विविध देवस्थान इनाम जमिन गैरव्यवहार प्रकरणात बीड धर्मादाय आयुक्त कार्यालयातील आधिकारी जबाबदार असुन त्यांनी रेकॉर्ड पुनर्विलोकन करून परिशिष्ट १ प्रमाणे जपणुक करून कर्तव्य बजावले असते तर जमिन गैरव्यवहार होऊन कोट्यावधी, रूपयांचा शासनाचा महसुल बुडाला नसता त्यामुळेच त्यांच्या कालावधीतील गैरव्यवहार प्रकरणातील जमिनींचे मुल्यांकन करून आर्थिक नुकसान भरपाई करण्यात यावी तसेच जमिन गैरव्यवहार प्रकरणात धर्मादाय आयुक्त बीड जाणीवपूर्वक गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ करत असून संबधित प्रकरणात प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी मुख्यमंत्री, प्रधान सचिव, महसुल मंत्री, प्रधान सचिव महसुल व वनविभाग, धर्मादाय आयुक्त मुंबई,धर्मादाय आयुक्त लातुर, विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना केली आहे.

वक्त बोर्डाकडुन गुन्हे दाखल परंतु धर्मादाय आयुक्ताकडुन जाणीवपूर्वक दुर्लक्ष ;कारवाईसाठी प्रजासत्ताकदिनी आंदोलन 
___
बीड जिल्ह्य़ातील मुस्लिम दर्गाह देवस्थान ईनामी जमिन गैरव्यवहार प्रकरणात आष्टी तालुक्यातील ३ ठिकाणी तर बीड तालुक्यातील एका ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत परंतु हिंदु देवस्थान इनाम जमिन गैरव्यवहार प्रकरणात एकही गुन्हा दाखल करण्यात आला नाही, जाणीवपूर्वक कारवाईस टाळाटाळ करण्यात येत असून संबधित प्रकरणात चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी. यासाठी २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. 

No comments:

Post a Comment