गेवराई ( प्रतिनिधी )महिलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले पाहिजेत. महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याने त्यांच्या कलागुणांना वाव मिळतो आणि तिला व्यक्त होता येईल, माँ संतोषी अर्बन बँकेने महिलांना प्रोत्साहन दिलय, त्यामुळे त्यांच्या टीमचे कौतुक व्हायलाच हवे, असे प्रतिपादन नगरसेविका गिताभाभी बाळराजे पवार यांनी येथे केले.
शनिवार ता. 15 रोजी गेवराई येथील माँ संतोषी अर्बन निधीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हळदीकुंकू तिळगुळ महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात त्या बोलत होत्या. शहरांमधील माँ संतोषी अर्बन निधीचा भव्य हळदीकुंकू तिळगुळ महोत्सव शनिवारी उत्साहात साजरा झाला. व्यासपीठावर सौ. पार्वतीबाई सखाराम काळे , सौ.रत्नमाला ताई मोटे , सौ.मासाहेब भाभी, सौ.शितलताई दाभाडे , सौ.प्रितीताई गर्जे, सौ. सोनालीताई जंवजाळ कु. पुजा ताई मोरे,सौ. वर्षाताई घुंबार्डे, डॉ. कोमलताई काळे, सौ.देवीताई मोटे, डॉ. वर्षाताई माने, सौ.ज्योतीताई भंडारी, सौ.निताताई बेद्रे, सौ.दीपालीताई माने यांची उपस्थिती होती. माँ संतोषी अर्बन निधीचे चेअरमन संजय बालाजी भालशंकर यानी प्रास्ताविक करुन कार्यक्रमाची सुरुवात केली. प्रास्ताविक भाषणात त्यांनी माँ संतोषी अर्बन निधीचा हळदीकुंकू तिळगुळ महोत्सव घेण्या मागचं उद्देश सांगितला. प्रत्येक कार्यक्रमात महिलांनी सहभाग घेतला पाहिजे. त्यामुळे, कलागुणांना प्रोत्साहन मिळेल, हा या संस्थेचा उद्देश आहे. प्रत्येक क्षेत्रात महीला पुढे जात आहेत. आपला विकास करत आहेत. त्याच बरोबर, घर ही सांभाळून विविध क्षेत्रात नावलौकिक करत आहेत. अशा अनेक महीला पुढे जात आहेत. देशाची प्रगती करत आहेत. असे ही चेअरमन भालशंकर यांनी सांगितले. सौ. गीता भाभी पवार यांनी आपल्या भाषणाची स्व. सिंधूताई सपकाळ यांना आदरांजली अर्पण करून केली महिलांनी सक्षम होऊन विविध क्षेत्रात पुढे यावे व आपले विचार व्यक्त करावेत असा संदेश दिला. यावेळी पुजाताई मोरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले महिलांनी आपल्या प्रकृतीची काळजी घेऊन पुढे यावे. कॅन्सरपासून स्वतःचा बचाव कशा प्रकारे आपण करू शकतो याची माहिती सांगितली. माँ संतोषी अर्बनच्या माध्यमातून महिलांसाठी विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनाची महिलांमध्ये चर्चा सुरू होती. व या कार्यक्रमाला महिलांनी हजर राहून उत्स्पूर्त प्रतिसाद दिला. यावेळी उपस्थित महिलांसाठी उखाणे स्पर्धा घेण्यात आली. विजेत्या महिलांना प्रमाणपत्र व बक्षीस देण्यात आले ज्या महिलांना बक्षीस मिळाले आहेत. ज्योती नितिन कुलथे, गीतांजली मुंदडा ,लीला दागडिया, चंदा उडान, वैशाली उडान यांनी उखाणे घेऊन बक्षीस मिळवले. तसेच पैठणी चे विजेत्या महिलांमध्ये अश्विनी कुलकर्णी, सीमा बोराडे , दिपाली बोराडे, प्रियांका पाटेकर , मीरा आढाळे यांचा समावेश आहे. यावेळी संतोष भालशंकर, राहूल गिरी , माधव चाटे , गणेश मोटे , शैलेश जाजू , माधव बेदरे, झिरपे गुरुजी , अमोल माळवे, सतीश माने, भागवत शिंदे , राजू मोरे, प्रमोद शिंदे , राहूल मडके, भोसले आप्पासाहेब, व माँ संतोषी अर्बन कर्मचारी प्रीती खडके , प्रविण कुलथे, धीरज वरकड , मंगेश गायकवाड , ज्ञानेश्वर वाटमोडे , विनोद पानसरे , शुभम मडकर, शुभम काळे, विशाल शेलार , दादा खडके, प्रदीप वादे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन राहुल गिरी यांनी केले.
No comments:
Post a Comment