Thursday, January 13, 2022

राष्ट्रमाता, राजमाता माँ साहेब जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी.मानव कल्याणाकरिता बहुजनाचे स्वराज्य स्थापनेसाठी मा जिजाऊ यांचे मोलाचे योगदान - दिलीप गोरे


 बीड (प्रतिनिधी) शेतकरी, माता भगिनींचे संरक्षण व सन्मान तसेच सर्व सामान्यांच्या हिताकरिता अठरापगड समाजातील मावळ्यांना एकत्र  करून लोककल्याणकारी स्वराज्याची स्थापना करिण्याकरिता राष्ट्रमाता माँ जिजाऊ यांचे  शिवरायांना मोलाचे मार्गदर्शन लाभले असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष तथा जि.प. सदस्य दिलीप गोरे यांनी केले. कँप्टन राजाभाऊ आठवले यांच्या अध्यक्षतेखाली से. ब. अ-क. महासंघ कार्यालय धानोरा रोड बीड येथे राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेबांची 424 वी जयंती कार्यक्रम आयोजित करून अभिवादन केले. याप्रसंगी प्राचार्य नारायणराव थोरात व नगरसेवक सुभाष सपकाळ प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते. (जन्मदिन) वाढदिवसानिमित्त सेवानिवृत्त महासंघाचे सदस्य राम साळवे यांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.  उपस्थित आनंदराव सरवदे यांनी बहुजनांचा इतिहास सत्य घटनांना डावलून कसा विरोधाभासी लिहिला आहे, हे माँ जिजाऊ साहेबांच्या जीवनातील अनेक प्रसंग सांगून सविस्तरपणे  स्पष्ट केले. तर प्रशांत वासनिक यांनी बहुजनांना धर्मीककर्मकांडाच्या गुलामगिरीतून तसेच सांस्कृतिक, शैक्षणिक, मानसिक व आर्थिक गुलामगिरीतून मुक्त व्हायचे असेल तर राष्ट्रमाता जिजाऊ व विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या राज्यकारभाराचा सद्य परिस्थितीतील बहुजनांनी सखोल अभ्यास करून चिंतन करणे गरजेचे आहे तरच सुराज्य स्थापनेस मदत होईल हे प्रत्येकाने पक्के लक्षात ठेवावे असे इतिहासातील अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केले. याप्रसंगी प्राचार्य थोरात सरांनी सर्वांना जाणीव करून दिली की, आपल्या आदर्श महापुरुषांनी व आदर्श मातांनी कोण्या एका विशिष्ट समाजाहिताकरिता कार्य केले नाही तर मानसांनी माणसाशी माणसासारखे वागावे या करिता कार्य केले. हा महापुरुषांचा आदर्श सर्वानी डोळ्यासमोर ठेवून सद्य परिस्थितीत आपल्या समाजात वावर ठेवणे अत्यंत गरजेचे आहे असे प्रतिपादन केले. नगरसेवक सुभाष सपकाळ व यशवंतराव वावळकर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप कॅप्टन राजाभाऊ आठवले यांनी विषमतावादी प्रवृत्ती पासून दूर राहून समता, एकोपा स्थापनेला प्राधान्य देऊन सतत राष्ट्रीयहित डोळ्यासमोर ठेवून कार्य करणे हेच राष्ट्रमाता, राजमाता माँ जिजाऊंना खरे अभिवादन ठरेल असे प्रतिपादन केले. जयंतीचे औचित्य साधून _"वाचाल तर वाचाल"_फिरते मोफत वाचनालयातर्फे राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व माता रमाई या थोर आदर्श मातांच्या जीवनचरित्रांचे ५ ग्रंथ तर वंचित बहुजन आघाडीचे ता. महासचिव अनिल कोठेकर यांनी माँ जिजिऊंच्या जीवन चरित्रांचे २ ग्रंथ महामानव सार्वजनिक वाचनालयाला भेट दिले. 
    कार्यक्रमास यशवंतराव कदम, बी.जी. दळवी,  इंजि. वसंतराव तरकसे, प्रा. अशोक गायकवाड, सुधाकर विद्यागर (नाना), एस.ए. सोनवणे, श्रीमंत साळवे, विशाल नवले, राम परजने, प्रणित सरवदे, संजय बनसोडे, नागेश गायकवाड, अभिजीत डोंगरे, आयु. कांताबाई जाधव, आशाताई विद्यागर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जी.एम. भोले सर यांनी केले तर सूत्रसंचालन डी.एम. राऊत यांनी केले व आभार प्रदर्शन डी.जी. वानखेडे यांनी मानले.

   


No comments:

Post a Comment