अहमदनगर(प्रतिनिधी )सामाजिक न्यायविकास मंत्री धनंजय मुंडे आणि सामाजिक कार्यकर्त्या करूणा मुंडे यांच्यातील वाद संपूर्ण महाराष्ट्राला परिचीत आहे. काही दिवसांपूर्वी करूणा मुंडे यांनी अहमदनगर येथे नवीन पक्षाची घोषणा केली होती. त्यानंतर खळबळ माजली होती. आता पुन्हा त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे खळबळ माजली आहे.
करुणा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?
करूणा मुंडे यांनी पक्षाच्या प्रसारासाठी दौऱ्याला सुरुवात केली आहे. अहमदनगरमधील संगमनेर येथून त्यांनी दौऱ्याला सुरुवात केली आहे. यावेळी त्यांनी संगमनेर येथे पत्रकार परिषद घेतली आहे. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी धनजंय मुंडे यांचाही माझ्या पक्षाला पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्याने खळबळ माजली आहे. 'मी काहीच करू शकणार नाही असे वाटणाऱ्या पती धनंजय मुंडे यांचाही आमच्या नव्या पक्षाला पाठिंबा आहे', असं वक्तव्य करूणा मुंडे यांनी केलं आहे.
याशिवाय एक अदृष्य शक्ती आपल्याकडून हे कार्य करवून घेत असून, महिला व सामाजिक भान असलेल्या कार्यकर्त्यांनी संपर्क करावा, असं आवाहनही त्यांनी केलं आहे
No comments:
Post a Comment