परळी वैजनाथ (प्रतिनिधी) पुतणीवर अत्याचार करणाऱ्या एका चुलत्याला अंबाजोगाई जिल्हा सत्र न्यायालयाने वीस वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली असून, दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. चार वर्षांपूर्वी चुलत्यानेच आपल्या अल्पवयीन पुतणीवर अत्याचार केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. न्यायालयात झालेल्या संपूर्ण सुनावणीनंतर अंबाजोगाई जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीला वीस वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. सद्दाम रहीम शेख (रा. मलिकपुरा, परळी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
परळी येथील अल्पवयीन पुतणीवर अत्याचार केल्याप्रकरणी चुलत्यास दोषी ठरवत वीस वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायाधीश संजश्री घरत यांनी ठोठावली. परळी येथील सद्दाम पी. रहीम शेख याची पाच वर्षीय पुतणी घरात खेळत होती. यावेळी घरात कोणीही नसल्याच्या फायदा घेत त्याने पुतणीवर अत्याचार केला. घटनेची माहिती कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
दरम्यान, मुलगी पडली म्हणून आईने तिची विचारपूस केली असता हा प्रकार उघडकीस आला. पीडित मुलीच्या आईने 1 सप्टेंबर 2018 रोजी परळी शहर पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दिली होती. या प्रकरणाचा तपास सहा. पोलिस निरीक्षक श्रीकांत डोंगरे यांनी केला. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीपुरावा व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीस वीस वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि दहा हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अॅड. शिवाजी मुंडे यांनी काम पाहिले.
Friday, June 2, 2023
पुतणीवर अत्याचार करणाऱ्या चुलत्याला वीस वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा अंबाजोगाई जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल.
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment