जालना (प्रतिनिधी): जालन्यात पोलीस अधीक्षक यांच्या निवस्थाजवळ आलेल्या माढा कॉलोनीतील अशोक लाड यांच्या घरावर चोरट्याने दरोडा टाकल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. यात महिलेला मारहाण करत चोरट्यांनी रोख रकमेसह सोने– चांदीचे दागिने लांबविले आहेत.
जालना शहरातील माढा कॉलनीतील अशोक लाड यांच्या घरातील सर्व मंडळी गच्चीवर झोपलेले होते. घरात आपल्या मुलींसह झोपलेल्या सावित्रीबाई यांना भाडेकरू महिलेने आवाज दिल्याने त्या जाग्या झाल्या. त्यांनी दरवाजा उघडला असता दरवाजा बाहेर पाच ते सहा जण उभे असल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. त्यांनी दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या पाच ते सहा जणांनी दरवाजाला जोरदार धक्का देवून लाठ्या काठ्यांनी डोक्यावर आणि पायावर मारहाण करत महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली.
गच्चीवरची मंडळी खाली आली तोवर..
घरातील एक लाख रुपये रोख रकमेसह अंगावरील व घरातील महालक्ष्मीच्या अंगावरील दागिन्यासह धूम ठोकली. सावित्रीबाई यांचा आवाज ऐकल्यानंतर गच्चीवर झोपलेल्या घरातील मंडळीने धाव घेऊन या चोरांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत रोख रकमेसह दागिने घेऊन दरोडेखोर पसार झाले. जालना जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर घडलेल्या या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
No comments:
Post a Comment