Tuesday, June 13, 2023

संत गजानन महाराजांची पालखी आषाढी वारी परळी मुक्कामी. परळीत रंगला भक्तीसोहळा.


*पालखी मार्गात अल्पोपहार,चहापाणी, पिण्याचे पाणीची व्यवस्था विविध सामाजिक संघटनेच्यावतीने करण्यात आली. 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : संतश्रेष्ठ गजानन महाराजांची पालखी व आषाढी वारीमूळे  वैद्यनाथाच्या परळी नगरीत आज भक्तीसोहळा रंगला. त्यामुळे शहरात चैतन्यदायी वातावरण निर्माण झाले होते. टाळ -मृदंगाच्या तालावर भजन करत गण गण गणात बोते, विठ्ठल नाम आणि माऊलीचा वारकरी जयघोष करीत होते.

संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचे परळी शहरात मंगळवारी सकाळी उड्डाणपूलावरून आगमन झाले. शहरात ठीक ठिकाणी या पालखी सोहळ्याचे स्वागतकरून हजारो भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. स्वागतासाठी शहरात पालखी मार्गावर नागरिक सज्ज झाले होते. शेगाव येथून आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे परळीमार्गे निघालेल्या संत गजानन महाराज पालखीवारीचे गंगाखेडहून परळीच्या शक्तीकुंज वसाहतमध्ये आज दुपारी आगमन झाले. पालखी मार्गात अल्पोपहार,चहापाणी, पिण्याचे पाणीची व्यवस्था विविध सामाजिक संघटनेच्यावतीने करण्यात आली. 

No comments:

Post a Comment