Friday, June 9, 2023

औरंगजेबाचे स्टेटस ठेवल्याने तणाव.हिंदू संघटनांकडून आष्टी बंदचा निर्णय.

आष्टी (प्रतिनिधी)  इन्स्टाग्रामवर औरंगजेबचा फोटो टाकून “बाप तो बाप रहेगा" मजकूर टाकल्याने बीडच्या आष्टी शहरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्या विरोधात आष्टी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोल्हापूर, अहमदनगरनंतर औरंगजेबाचे फोटो प्रकरण बीड जिल्ह्यात पोहचल्याने पोलीस प्रशासन अलर्ट झाले आहे. 

आष्टी शहरातील आझादनगर येथील एका तरुणाने औरंगजेबाच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर स्टेट्स ठेऊन “बाप तो बाप रहेगा" असा मजकूर टाकल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला. सदरील तरूणावर आष्टी पोलिसांत रात्री उशीरा गुन्हा दाखल करत हिंदू संघटनेच्या वतीने आज आष्टी बंदचे आवाहन करण्यात आले आहे.

याप्रकरणी पोलिसांत  दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय, की आष्टी येथील रहीवाशी व माझ्या परिचयाचा जैद अय्युब सय्यद यांचे इंन्स्टाग्राम अकाऊंट पाहिले असता त्याच्या अकाउंटवर लबेका ग्रुप आष्टी या पेजवर औरंगजेब यांचा फोटो व त्या फोटोला “बाप तो बाप रहेगा" असे वाक्य टाकलेले दिसून आले. 

औरंगजेब हा शिवाजी महाराजांचा शत्रु असल्याचा इतिहास असून छञपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्र राज्याचे दैवत मानले जातात. परंतु तरी देखील इन्स्टाग्रामच्या अकाउंटवर औरंगजेबाचे फोटो टाकून व त्यावर “बाप तो बाप रहेगा" अशा आशयाचे वाक्य टाकले. यामुळे हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या असून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होईल, असे कृत्य केले असल्याची तक्रार आष्टी ठाण्यात दिली.

त्या तक्रारीवरून जैद अय्युद सय्यदयाच्या  विरोधात भारतीय दंड संहिता १८६० नुसार कलम २९५(A),५०५(१)(ब)नुसार आष्टी पोलिसांत गुन्हा दाखल झाला. दरम्यान, कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नका. तेढ निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करू नये, जर कुणी काही कृत्य करतांना आढळून आले तर पोलिस प्रशासन,महसूल प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

No comments:

Post a Comment