Monday, June 19, 2023

धक्कादायक! २५ वर्षीय शिक्षिकेची गळफास लावून आत्महत्या.


पैठण (प्रतिनिधी)  छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पैठण मधे एका खासगी शिक्षण संस्थेत नव्यानेच रुजू झालेल्या शितल नरके या शिक्षकेने काल सकाळी आठ ते साडेआठच्या दरम्यान आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली .

एका शिक्षण संस्थेमध्ये शिक्षिका असलेल्या शितलने स्वतःच्या राहत्या घरी आत्महत्या केली आहे . त्या खाजगी शिकवणी पण घेत असत . आयसीआयसी बँकेच्या दुसऱ्या मजल्यावर त्या आपले पती आणि तीन वर्षाच्या मुलासोबत राहत होत्या . शितलने यांनी गळ फास | घेतल्याची वार्ता सर्वत्र पसरली . तातडीने पैठण पोलीस स्टेशनला घटनेची माहिती कळविण्यात आली . पो . नि . लक्ष्मण केंद्रे , भोसले , मदने , ढाकणे यांनी घटनास्थळी धाव घेतली . घटनेची माहिती मिळताच संस्थेचे अध्यक्ष संतोष तांबे , मुख्याध्यापक आर . बी . रामावत , अभिजीत निंबाळकर आदींनी घटनास्थळी भेट दिली . मयत शितलचा मृतदेह शविच्छेदनासाठी येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला .

No comments:

Post a Comment