Tuesday, June 20, 2023

बीड जिल्हा रुग्णालयात मोठी शस्त्रक्रिया पोटातून काढला अडीच किलोचा गोळा.

बीड (प्रतिनिधी) : महिलेच्या पोटात असणारा तब्बल अडीच किलोचा गोळा, शस्त्रक्रिया करून काढण्यात बीड जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले आहे. ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांच्या मार्गदर्शनाने यशस्वीरित्या पार पडली असून महिलेची प्रकृती व्यवस्थित आहे. त्यामूळे जिल्हा रुग्णालय टीमचे कौतुक केले जात आहे.
 बीड  तालुक्यातील चांदेगाव येथील सुनीता कल्याण कोल्हे या मागील अनेक दिवसांपासून पोटाच्या त्रासाने त्रस्त होत्या. खाजगी रुग्णालयात हजारो रुपये लागतील असे सांगितले होते. मात्र बीड जिल्हा रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया केल्याने या कुटुंबाला आर्थिक बचत तसेच त्रास मुक्त झाल्याने जिल्हा रुग्णालयाचे आभार मानले.
रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचा विश्वास असल्याने, जिल्हा रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. डॉ. सुरेश साबळे हे वैयक्तिक रुग्णांकडे लक्ष देत असल्याने सर्व शस्त्रक्रिया मोफत आणि चांगल्या केल्या जात आहेत. त्यामुळे गरीब व गरजूंना रुग्णसेवा मिळत आहे.

No comments:

Post a Comment