बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील पुंडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस ग्रामस्थांनी कुलूप ठोकले. जिल्हा परिषद शाळा सुरू होऊन अवघे ४ दिवस होत नाही. तोपर्यंत शिक्षकांच्या रिक्त जागांचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. त्या जोपर्यंत भरण्यात येत नाहीत; तोपर्यंत शाळा भरू देणार नाही, असा इशारा पुंडी ग्रामस्थांनी दिला असून शाळा बंद करण्यात आली आहे. त्यामूळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार आहेत.
No comments:
Post a Comment