अदखलपात्र गुन्हात मदत करण्यासाठी 5 हजार स्वीकारताना शिरूर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यास रंगेहाथ पकडले आहे. शिवाजी श्रीराम सानप (वय 41) असं लाचखोर कर्मचाऱ्याचं नाव आहे. शिवाजी सानप यांनी तक्रारदाराकडून अदखपाञ गुन्ह्यात मदत करण्यासाठी 10 हजाराची मागणी केली होती.
तडजोडी अंती 5 हजारात तडजोड झाली. दरम्यान तक्रारदाराची मुळीच लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने ही माहिती लाचलुचपत पथकाला दिली. माहिती मिळताच पथकाने सापळा रचून सानप यांना रंगेहाथ लाच घेताना पकडले. सानप यांच्यावर लाचखोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
No comments:
Post a Comment