परळी वैजनाथ (प्रतिनिधी) श्रीगजानन पालखीचे परळी शिमेवर स्वागत ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले पालखीच्या स्वागतासाठी तालुकाध्यक्ष विश्वांभर महाराज उखळीकर, गुरूशिष्य प्रतिष्ठान चे अध्यक्ष वैजनाथराव सोळंके,माजी उपनगराध्यक्ष रविंद्रभैया परदेशी, श्रीनाथ सेवाभावी संस्थेचेअध्यक्ष यशवंतराव चव्हाण,उपाध्यक्ष हनुमंत आगरकर यांच्या सह वारकरी मोठ्या संखेने उपस्थित राहुन पालखीतील विनेकरी मृदंगवादक,गायक टाळकरी वारकरी महाराज मंडळींचाही पुष्पगुच्छ देऊन वारकरी मंडळाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले कोकाटे महाराज यांनी साष्टांग दंडवत वारक-यांच्या चरणी घेऊन कोकाटे महाराज यांनी पंढरपुरकडे निघालेल्या वारकरी मंडळींना चाह पाणी गुरूशिष्य प्रतिष्ठानच्या वतीने व्यवस्था करण्यात आली पालखीचा संत गजानन महाराज संस्थान ते श्रीक्षेत्र पंढरपुर पायीवारी सोहळा
वाट धरिता पंढरीची चिंता हारे संसाराची ॥ १ ॥ ऐसे कोठे नसे पायी । धुंडीता ब्रह्मांड पाही ।। २ ।।
पाहीले शोधुनी तिर्थे आणि देवस्थानी ॥३॥ मोक्ष भक्ती पाही । सेना म्हणे लागा पायी ॥ ४ ॥
श्री गजानन महाराज संस्थान, शेगांव यांची पालखी शेगांव येथून शुक्रवार दि.२६/०५/२०२3 रोजी निघाली.गजानन महाराज
पालखी सोबत ७०० वारकरी मंडळीसह 3आश्व व 9 गाड्या आहेत.
वारकऱ्यांकरीता अॅम्बुलन्स गाडी डाॅक्टर व सहकार्यासह आहे. या व्दारे श्री पालखीतील व वटचालीमध्ये असणान्या इतर दिंडीतील वारकऱ्यांकरीता औषधोपचार केल्या जातो. वारक-याकरिता पानी पिण्याकरीता टँकरची व्यवस्था केलीआहे.
श्रींची पालखी श्री क्षेत्र पंढरपूर येथे दि.२७/०६/२०२३ ला पोहचेल.श्रीची पालखी आज थर्मल काॅलनी परळी
येथे श्रीराम मंदिर न्यु हायस्कूल शाळेत मुकामी आहे त्या ठिकाणी रात्री किर्तनाचा कार्यक्र उत्साहत संपन्न झाला भाविकांनी गन गन गनात बोते या नाम उच्याराने जय घोषात थर्मल काॅलनी दुमदुमली कीर्तन श्रवणाचा भाविकांनी किर्तनाचा लाभ घेतला जय गजानन प्रत्येकाच्या मुखात श्रीचे नामचिंतन होत होते दर्शनाचा लाभ भाविकांनी घेतला श्रींचे पायीवारी
पालखी सोहळ्याचे ५४ वे वर्ष आहे.श्रीचा पालखीचा
श्री क्षेत्र पंढरपूर येथे (चतुर्दशी) चौदस पर्यंत मुकाम असतो व काला करून श्रींची पालखी पौर्णिमेला परतीच्या प्रवासाला सुरूवात करते.गावोगावी श्रींचे
पालखीचे स्वागत मोठ्या श्रध्देने,भक्ती भावाने उत्साही वातावरणामध्ये केल्या जाते. अन्नदान खुप मोठ्या प्रमाणावर होते
श्री क्षेत्र पंढरपूर येथे पालखी मुकामी असतांना श्री संस्थानच्या वतीने नवमी, दशमी, एकादशी व व्दादशी (बारसला) जवळपास 3 लाखाचे वर वारकरी भक्तांना महाप्रसाद मिष्टाअन्नासह वितरीत करण्यात येतो. संस्थेच्या नियमा प्रमाणे भजनी साहित्य जसे १० टाळजोड, विणा सूदंग, हातोडी व संत साहित्य श्री ज्ञानेश्वरी, श्री एकनाथी भागवत व श्री तुकाराम महाराज गाथा दिल्या जाते. आजपर्यंत महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, कर्नाटक, आंध्रप्रदेश, गोवा, तेलगंणा या राज्यातील ७६ जिल्ह्या मध्ये आज रोजी १९.3३६ (एकोणीस हजार तीनशे छतीस गावांना भजनी साहित्य वितरण करण्यात आले आहे व अखंड सेवा सुरू आहे.
पालखी श्री क्षेत्र पंढरपूर वारी करीता जात असतांना मार्गाने भेटना-या दिंड्यामधील वारक-यानां गजानन महाराज संस्थान तर्फे कापड प्रसादाचे वितरण करण्यात येते तसेच दिंडीतील वारकन्यांकरीता औषधोपचार केल्या जातो
श्रीची पालखी वेगवेगळ्या 9 जिल्ह्यामधुन मार्गक्रमण करीत शेगाव ते पंढरपूर प्रवास 33दिवसाचा 750किलो मिटरचे अंतर पारकरते अशी ही संत गजानन महाराज पालखी दरवर्षीप्रमाणेच पायी वारी नित्य नेमाने चालत आस्ते सर्वमाहिती ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे यांनी दिडीतील गजानन महाराज संस्थानातील सेवेकरी महाराज मंडळीनी ही माहिती दिली ही माहीती सांगीतल्या बद्दल कोकाटे महाराज यांनी आभार मानून पुढील प्रवासाला शुभेच्छा दिल्या
No comments:
Post a Comment