याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, सद्या सुरू असलेल्या खरीप हंगामात बोगस खते व बियाणांची विक्री होऊ शकते. त्या अनुषंगाने जिल्हा गुण नियंत्रक पथकाच्यावतीने कृषी दुकानांच्या नियमित तपासण्या केल्या जात आहेत. यादरम्यान माजलगाव शहरातील नवा भारत फर्टिलायझर्स लिमिटेड या खत विक्री केंद्राची तपासणी जिल्हा गुण नियंत्रक पथकाकडून करण्यात आली.
या तपासणी दरम्यान केंद्रामध्ये नोंदणी प्रमाणपत्र ठळक व साफ दिसेल, अशा ठिकाणी प्रदर्शित केलेले नव्हते. रासायनिक खतसाठा रजिस्टर तसेच शेतकऱ्यास दिलेले खरेदी बिल सादर केले नव्हते. विक्रीकरिता असलेल्या खतांची बिले ठेवलेली नव्हती.
दुकानातील साठा रजिस्टर एन फॉर्ममध्ये ठेवलेले नव्हते. त्यामुळे प्रत्यक्ष खतसाठ्याची पडताळणी करता आली नाही. शेतकऱ्यांना पक्की बिले दिल्याचे पथकाला आढळून आले नाही. विशेष म्हणजे विक्री केंद्रामध्ये खत नियंत्रण आदेश 1985 च्या शेड्युलमध्ये समाविष्ट नसलेल्या खताचा ग्रेड विक्रीस ठेवून खत नियंत्रण आदेशाचे उल्लंघन केल्याचं समोर आलं. त्यामुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबसाहेब जेजुरकर यांनी या दुकानाचा परवाना रद्द केला आहे.
No comments:
Post a Comment