मुंबई (प्रतिनिधी)- महाराष्ट्र सरकारनं राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या (IAS Officers Transfers) केल्या आहेत.
आयुक्त, सहकार आणि नोंदणी, को-ऑपरेटिव्ह सोसायटी यांचे आयुक्त असलेले जगदीश पाटील यांच्याकडे कोकण विभागाच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली असून विकास देशमुख यांच्याकडे कृषी सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
सध्या मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त असलेल्या संजय देशमुख यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभागाच्या प्रधान सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
कोणत्या अधिकाऱ्याची कुठे बदली?
राजगोपाल देवरा (Rajagopal Devara), IAS (1992) : राजशिष्टाचार विभागाचं प्रधान सचिवपद (महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव)
राजेश कुमार (Rajesh Kumar), IAS (1988) : अपर मुख्य सचिव, ग्रामविकास विभाग – मदत आणि पुनर्वसन विभाग
अनुप कुमार (Anoop Kumar), IAS (1990) : अपर मुख्य सचिव, सहकार आणि पणन विभाग-कृषी विभाग
राधिका रस्तोगी (Radhika Rastogi), IAS (1995) : प्रधान सचिव, पर्यटन विभाग
संजय खंदारे (Sanjay Khandare), IAS (1996) : प्रधान सचिव, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग
एकनाथ डवले (Eknath Dawale), IAS (1997) : प्रधान सचिव कृषी विभाग – ग्रामविकास विभाग
सौरभ व्यास (Saurabh Vijay), IAS (1998) : प्रधान सचिव, पर्यटन विभाग विकास आयुक्त, नियोजन विभाग
आर.एस.जगताप (R.S.Jagtap), IAS (2008) : उप महा, यशादा पुणे
जितेंद्र दुडी (Jitendra Dudi), IAS (2016) : मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सांगली – जिल्हाधिकारी सातारा
No comments:
Post a Comment