Thursday, April 7, 2022

संत गोरोबाकाका समाधी सोहळया निमित्ताने संतसंमेलनास उपस्थित राहवे - ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
श्री संत गोरोबा काका समाधी सोहळ्या निमित्ताने  वारकरी संत संमेलनास 27 एप्रिल बुधवार रोजी दुपारी 2 ते 5 गोरोबा काका संस्थान तेर येथे  महाराष्ट्रातील वारक-यांनी मोठ्या   संख्येने उपस्थित रहावे आसे ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे यांनी  प्रसिद्धी पञकव्दारे कळवले आहे या संमेलनास महाराष्ट्रातुन जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा संत गोरोबा काका देवस्थानचे अध्यक्ष  ह.भ.प.संदिपान महाराज हासेगावकर यांच्या नेतृत्वाखाली पारपडणार संत संमेलन, अ.भा.वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले,ह.भ.प. क्रांतीवीर बंडा तात्या कराडकर ,देहु येथील गाथा मंदिराचे अध्यक्ष ह.भ.प.पांडुरंग महाराज घुले,ह.भ.प.पद्म्नाभ महाराज तेर,प्रदेश अध्यक्ष ह.भ.प.आनिल महाराज वाळके, संत संमेलन राज्य प्रमुख अतुल महाराज आदमाने शनिशिंगनापुर,ह.भ.प.आण्णासाहेब महाराज बोधले, ह.भ.प.परमेश्वर महाराज बोधले,ह.भ.प.रामेश्वर महाराज बोधले,ह.भ.प.भारत महाराज कोकाटे, आळंदी येथील आनिल महाराज पाटील यांच्या सह महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकार मोठ्या संख्येने  उपस्थित राहावे ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे यांनी  महाराष्ट्रातील किर्तनकार गायणाचार्य वादनाचार्य प्रवचनकार इत्यादी मंडळींनी उपस्थित राहून संमेलनाचा लाभ घ्यावा असे आव्हान ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे  संत संमेलन राज्य उपाध्यक्ष अ.भा.वारकरी मंडळ यांनी  केले आहे.

No comments:

Post a Comment