Friday, April 8, 2022

कांतीकारी साथी न्युज आजचे राशी भविष्य ८ एप्रिल २०२२; 'या' राशीच्या व्यक्तींना धनप्राप्तीचा योग, विविध मार्गांनी मिळेल पैसा.


मेष- विविध प्रकारचे लाभ होतील. लोकांच्या भेटीगाठी होतील. मन मोकळे झाल्यासारखे वाटेल. एखाद्या व्यवहारात चांगला फायदा होईल. आपली महत्त्वाची माहिती लोकांना सांगू नका. नोकरीत सतत कार्यरत राहताल. नवीन माहिती कळेल, त्याचा भविष्यात लाभ होईल. 

वृषभ - महत्त्वाच्या कामात यश मिळेल, पण बोलण्यावर संयम ठेवलेला बरा. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहिल. तुमचे पारडे जड राहिल. व्यवहारात सावधानता बाळगा. कुणाच्या गोड प्रलोभनाला बळी पडू नका. आर्थिक आवक चांगली राहिल. वेळ वाया घालवू नका. 

मिथून - मनात प्रसन्न विचार राहतील. प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू राहिल. नोकरीत एक पाऊल पुढे पडेल. जोडीदार तुमच्या मर्जीनुसार वागेल. करमणुकीच्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. विविध प्रकारचे मान-सन्मान प्राप्त होतील. योग्य व्यक्तीच्या सहवासात याल. 

कर्क - महत्त्वाचे काम पुढे ढकलणे योग्य ठरेल. अन्यथा वेळ आणि पैसा खर्च होईल. तसेच, मनस्ताप सहन करावा लागेल. पूजापाठ जप केल्याने मनाला समाधान वाटेल. नोकरीत वादविवादात पडू नका. आपण भले की आपले काम भले, असे धोरण ठेवा.  

सिंह - सकारात्मक परिस्थिती राहिल. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. फटाफट कामे मार्गी लागतील. त्यामुळे, चांगले वाटेल. लोकांची मदत मिळेल, जोडीदार तुमच्या मर्जीनुसार वागेल. धनलाभाच्यादृष्टीने चांगला काळ. 

कन्या - घरात एखादा कार्यक्रम आयोजित केला जाईल. त्या कामानिमित्ताने गडबड राहिल. सतत कार्यरत राहाल. लोकांच्या गाठीभेटी होतील. नोकरीत अनुकूल बदल होतील. जोडीदार आपल्याला सांभाळू घेईल. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका.

तूळ - कामाच्या निमित्ताने फिरणे होईल, काहींना परगावी जावे लागेल. प्रसिद्धी मान-सन्मान मिळेल. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. ग्रहमानाची अनुकूलता आपल्या बाजुने राहिल. धनलाभाच्यादृष्टीने चांगला काळ आहे. मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील. 

वृश्चिक - नोकरीत वादविवादापासून दूर राहा. दगदग होईल अशी कामे करू नका. महत्त्वाचे काम पुढे ढकलणे ठीक राहिल. व्यवसायात विक्री चांगली होईल. गाडीची कागदपत्रे सांभाळून ठेवा. मनात सकारात्मक विचार राहतील, असे प्रयत्न करा. 

धनू - व्यवसायात विक्री चांगली होईल. आर्थिक उलाढाली जपून करा. मुलांच्या अडचणी समजून घेण्यासाठी वेळ द्या. नोकरीत अनुकूल वातावरण राहिल. महत्त्वाच्या प्रकल्पात सहभागी व्हाल. घरात खेळीमेळीचे वातावरण राहिल. जोडीदाराशी मधुर संबंध राहतील. 

मकर - धनलाभाच्या दृष्टीने अनुकूल परिस्थिती राहिल. थोडे प्रयत्न केले तर पैसे मिळतील. महत्त्वाचे निरोप येतील, आरोग्याची काळजी घ्या. महत्त्वाचे काम पुढे ढकलणे इष्ट ठरेल. कामाचा व्याप राहिल. मात्र, त्यातून मार्ग काढाल. 

कुंभ - संयमाने वागण्याची गरज आहे, स्वत:बद्दल नको तेवढा आत्मविश्वास बाळगू नका. तटस्थपणे विचारपूर्वक निर्णय घ्या. नावलौकिक वाढविणाऱ्या घटना घडतील. 

मीन - धनप्राप्तीचे योग आहेत. विविध मार्गांनी धनप्राप्ती होईल, अवांतर खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. जीवनसाथी चांगली साथ देईल. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील.

No comments:

Post a Comment