बीड (प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या पाली ग्रामपंचायत कार्यालयात विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच दशरथ राऊत यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती 14 एप्रिल 2022 गुरुवार रोजी सकाळी 9 वाजता पाली येथील ग्रामपंचायत कार्यालयमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर आपल्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनातून प्रकाश टाकला.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दीन-दलित शोषितांना न्याय तर दिला परंतु या देशाला स्वतःच्या कर्तुत्वावर जगावर अधिराज्य करण्याचा मंत्र राज्यघटनेच्या माध्यमातून दिला. त्यांचे कार्य अजरामर राहील असे मत मान्यवरांनी व्यक्त करून त्यांना अभिवादन केले.
या जयंतीनिमित्त पाली ग्रामपंचायतचे सरपंच दशरथ अण्णाभाऊ राऊत यांच्यासह उपसरपंच लक्ष्मण सिताराम नवले,पत्रकार संघाच्या जिल्हा उपाध्यक्ष दैनिक सूर्योदयच्या पत्रकार शेख आयेशा रफिक तसेच ग्रामपंचायत विस्तार अधिकारी व्ही एन मिसाळ, आर एल वीर, माजी सरपंच प्रकाश काकासाहेब वीर, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश लक्ष्मण वीर, प्रा.रावसाहेब भगवानराव वीर, नवले विकास प्रभू, शेख खलील शेख नईमुद्दीन, बाबासाहेब वीर, किशोर वीर, रोहिटे,अशोक गायकवाड, विकास देशमुख, अजित डोंगरे यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थ या जयंतीनिमित्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment