Tuesday, April 5, 2022

हवामान खात्याकडून 'या' १० जिल्ह्यांना इशारा, बरसणार अवकाळी पावसाच्या सरी...


मुंबई (प्रतिनीधी ) हवामान विभागाने पुढील चार दिवस अवकाळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. इतकेच नाही तर राज्यातील 10 जिल्ह्यांना हवामान खात्याने यल्लो अलर्ट दिला आहे. पुढील तीन दिवस राज्यातील विविध भागांत मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

* 5 एप्रिल -

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बुलढाणा, अकोला, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांत पावसाच्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला असून यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. 

No comments:

Post a Comment