Wednesday, April 6, 2022

जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी अध्यक्ष ह.भ.प. संदीपान महाराज हासेगावकर यांच्या हस्ते रामेश्वर महाराज कोकाटे यांचा सन्मान.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) जोग महाराज वारकरी   शिक्षण संस्था आळंदी चे अध्यक्ष ह.भ.प. संदीपान महाराज हासेगावकर यांच्या हस्ते मंगळवार दिनांक 5 एप्रिल रोजी अ.भा .वारकरी मंडळ संत संमेलनाच्या राज्य उपाध्यक्षपदी ह.भ.प. रामेश्वर महाराज कोकाटे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा  पुष्पमाळ शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

संत सावता माळी महाराज मंदिर येथे मंगळवार दिनांक 5 एप्रिल रोजी रावसाहेब देवराव आंधळे पोस्टमन यांच्या पुण्यस्मरणार्थ निमित्त जोग महाराज वारकरी  शिक्षण संस्था आळंदी चे अध्यक्ष ह.भ.प. संदीपान महाराज हासेगावकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते याच दरम्यान सत्कार करण्यात आला ह.भ.प.ऑड.दत्ताञय महाराजआंधळे,ह.भ.प.रानबा महाराज फड,ह.भ.प.दत्ता महाराज गडदे,
 नगरपरिषदेचे शिक्षण सभापती गोपाळ आंधळे,सचिन आरसुळे,ह.भ.प.गणेश महाराज उखळीकर, ह.भ.प.सुभाष महाराज मांडवेकर,ह.भ.प.रूक्षराज महाराज अंधळे, ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज कतारे,ह.भ.प.लिंबाजी महाराज मांडवेकर,ह.भ.प.गोरोबा महाराज शिंदे  यांच्यासह परळी शहर व पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते

No comments:

Post a Comment