Friday, April 1, 2022

केंद्रीय मंत्री ना.रामदास आठवले यांची सचिन कागदे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी-) केंद्रीय समाजकल्याण मंत्री ना.रामदास आठवले आज शनिवार दि. 2 एप्रिल रोजी परळीच्या दौर्‍यावर येत असून दु.1 वा. शिवाजी नगर येथील रिपाईचे युवक नेते सचिन कागदे यांच्या निवासस्थानी ते भेट देणार आहेत. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार असून रिपाईचे जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे हे त्यांच्या समवेत दौर्‍यात  सहभागी असणार आहेत.
केंद्रीय समाजकल्याणमंत्री ना.रामदास आठवले हे आज परळी शहरात येणार असून आपल्या दौर्‍यात ते रिपाईचे युवक नेते सचिन कागदे यांच्या निवासस्थानी सदीच्छा भेट देणार आहेत. यावेळी जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे व रिपाईचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. ना.रामदास आठवले प्रदीर्घ कालावधीनंतर परळी शहरात येत असल्याने त्यांच्या दौर्‍याची रिपाई कार्यकर्त्यांत उत्सुकता निर्माण झाली आहे.

No comments:

Post a Comment